पारनेर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सर्वस्व पणाला – आमदार नीलेश लंके

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- पारनेर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची ग्वाही देतानाच शहराचा वर्षानुवर्षांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही आपणच सोडवणार असल्याचे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले.

पारनेर शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार लंके यांच्या हस्ते पार पडले. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, नगरपंचायतीची स्थापना होऊन पाच वर्षे उलटली तरी या शहराचा विकास आराखडाही तयार होऊ शकला नाही हेच मोठे दुर्दैव आहे.

अग्निशमन व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन, नगरपंचायतीसाठी अद्ययावत इमारत, सामाजिक कार्यक्रमांसाठी अद्ययावत सभागृह यांसारख्या काहीच गोष्टी गेल्या पाच वर्षांत होऊ शकल्या नाहीत. शहरास सध्या ज्या हंगे तलावातून पाणी पुरवठा होतो. त्याच तलावातून हंगे गावालाही पाणीपुरवठा होतो.

 

हंगे गावाला रोज पाणीपुरवठा होत असताना पारनेर शहराला पंधारा दिवसाला पाणी का? लोकसंख्या जास्त असली तरी तलाव भरलेला असताना पाणीपुरवठयाचे योग्य नियोजन न झाल्याने नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागले. यापुढील काळात आपण शहरवासीयांच्या सर्व समस्या दूर करणार असून

तालुक्याच्या विकासाचा कणा म्हणून शहराचा विकास केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. ज्येष्ठ वकील पी. आर. कावरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, वकील राहुल झावरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, अशोक सावंत, सुदाम पवार, विक्रम कळमकर, रा. या. औटी, राजेंद्र चौधरी, डॉ. मुदस्सिर सययद,

नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, नंदकुमार औटी, सहदेव तराळ, विजय औटी,नंदा देशमाने, विजेता सोबले, साहेबराव देशमाने, विलास सोबले, आनंद औटी, शैलेंद्र औटी, राजेश चेडे, राजेंद्र खोसे,उमाताई बोरुडे, वैजयंता मते, लीलाबाई बोरुडे, पाकिजा शेख, कविता औटी आदींसह मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment