या तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- कोरोना, अतिवृष्टी व आता चोरट्यांचा धुमाकूळ अशा एकापाठोपाठ येणाऱ्या संकटांमुळे जामखेडकर पुरते वैतागले आहेत.

येथील शहरातील सदाफुले वस्ती, बोर्ले या ठिकाणी चोरी करून सुमारे पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर असे की,शहरातील मध्यवर्ती भागात आसलेल्या सदाफुले वस्ती येथील भास्कर झगडे हे झोपले असताना

मंगळवार दि २० रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागील गेटचे कुलुप तोडुन आत प्रवेश केला. या नंतर घराच्या आतील बाजुच्या दाराचा कडीकोंडा तोडुन चोरटे घरामध्ये घुसले. घरामधील कपाटातील १ लाख ८७ हजार ५०० रूपये व झगडे यांच्या पॅंटच्या खिशातील रोख रक्कम असा एवज चोरुन नेला.

पहाटच्या सुमारास ही घटना लक्षात आली. यानंतर भास्कर झगडे यांनी जामखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली. घटनास्थळी कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील सपोनि निलेश कांबळे यांनी भेट दिली. पुढील तपास पो.हे.कॉ बापूसाहेब गव्हाणे हे करत आहेत.

आठ दिवसांपूर्वीच अरणगाव येथे देखील घरफोडी करून चोरटय़ांनी लाखांचा ऐवज लंपास केला होता. बोर्ले येथील शेतकरी जयशिंग गोरख चव्हाण यांच्या घरी राञी २ च्या सुमारास उशाला असलेली चावी घेऊन घर उघडून कपाटातील रोख रक्कम ३५ हजार व व एक तोळ्याचा गंठन घेऊन लंपास केले.

कर्जतचे नवनिर्वाचित उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना चोरटयांनी एक सलामीच दिली आहे. आता जामखेडचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या पुढे एक मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चव्हाण, तागड, हिंगसे हे करत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment