निळंवडे कालव्याच्या खड्ड्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथे युवराज बबन घुगे (वय ४) या बालकाचा निळवंडे कालव्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. निळवंडे कालव्यासाठी खड्डे खोदण्यात आले आहेत.

पाऊस झाल्याने हे खड्डे पाण्याने तुडुंब भरले आहेत. युवराज खेळत असताना वस्तीलगत असलेल्या कालव्याच्या खड्यात पडला. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.

ठेकेदाराने खड्ड्यांभोवती सुरक्षा जाळी बसवावी, तसेच मृत बालकाच्या कुटुंबाला मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment