खुशखबर ! ‘ह्या’ देशी कोरोना लशीला तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी परवानगी ; ‘येथे’ होणार चाचणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाला थोपवण्यासाठी हैदराबाद स्थित भारत बायोटेक (Bharat biotech) कंपनीकडून कोव्हॅक्सीन नावाची लस विकसित केली जात आहे.

ही लस तिसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. लवकरच तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात होणार असून ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया ने तशी परवानगी दिली आहे. 2 ऑक्टोबरला भारत बायोटेकने तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी DCGI कडे परवानगी मागितली होती.

ही परवानगी आता मिळाली असून स्वदेशी लस लवकरच मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या लसीची कमिटी मीटिंग ५ ऑक्टोबरला झाली होती. त्यात कंपनीने तिसऱ्या टप्प्यातील प्रोटोकॉल्स पुन्हा जमा करण्यास सांगितले होते. कमिटीने दिलेल्या माहितीनुसा तिसऱ्या टप्प्प्यातील रचना आणि मांडणी ही समाधानकारक होती.

सुरूवातीला दुसऱ्या टप्प्यात सुरक्षा आणि इम्यूनोजेनिसिटीच्या माहितीच्या आधारे डोज तयार करता येतील त्यासाठी कमिटी फर्मकडून माहिती मागवण्यात आली होती. भारत बायोटेकच्या प्लॅननुसार कोवॅक्सिनचे शेवटच्या टप्प्यातील चाचणी दिल्लीव्यतिरिक्त उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब आणि आसाममध्ये होणार आहे.

कंपनीने फेब्रुवारीपर्यंत शेवटच्या टप्प्यातील चाचणीचे परिणाम दिसून येतील अशी आशा व्यक्त केली आहे. कोव्हॅक्सीन लस निर्माण करण्यासाठी भारत बायोटेक या कंपनीला ICMR चेही सहकार्य काहे. या कंपनीने क्लिनिकल ट्रायल संदर्भात नुकतेच एक निवेदन प्रसिद्ध केले.

त्यानुसार तिसऱ्या टप्प्यातील चाचणी 18 तसेच त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या स्वयंसेवकांवर करण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यात एकूण 28,500 स्वयंसेवकांवर चाचणी केली जाणार आहे. देशात एकूण दहा ठिकाणी कोव्हॅक्सीन लसीची चाचणी होणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment