लढाऊ नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांचा शासनाने गौरव करावा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- कोरोना संकट काळात जीवाची बाजी लावून प्रत्यक्षात रणांगणात उतरणाऱ्या, संगमनेर हाच आपला परिवार आहे, असे समजून संगमनेरकरांची काळजी घेणाऱ्या नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी लॉकडाऊन काळात शहराच्या प्रत्येक विभागात जाऊन मदत कार्य पोहचवले.

त्यांचे अभ्यासपूर्ण आणि जागरूक तत्पर नेतृत्व या कालखंडात संगमनेरकरांसाठी वरदान ठरले. म्हणून नवरात्रौत्सवानिमित्त शासनाने त्यांचा गौरव करावा, अशी मागणी जनतेतून होत आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यात नगराध्यक्ष तांबे यांनी खंबीर भूमिका घेतली. कोरोनाच्या प्रत्येक टप्यात जनतेमध्ये जागृती करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला.

शहरातील कचरा गोळा करणाऱ्या प्रत्येक गाडीवर बसवलेल्या ध्वनिक्षेपकाद्वारे स्वतःच्या आवाजात त्यांनी कोरोनाबद्दलची लोकांच्या मनातील भीती घालवत घायवयाच्या काळजी बाबत नागरिकांना मार्गदर्शन केले. सर्व प्रथम शहरातील मौलाना आझाद मंगल कार्यालय, पालिकेच्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर सुरू करून त्यांनी रुग्णांची व्यवस्था केली.

मालपाणी लॉन्स येथे अँटिजेंन रॅपिड टेस्ट सुरू केली त्यावर नियंत्रण ठेवले. शहरात संसर्गाचे प्रमाण वाढत असताना एकीकडे लोकांच्या आरोग्याची काळजी, तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे उपजीविकेचा निर्माण झालेला प्रश्न हे मोठे आव्हान त्यांनी आभ्यासूपणे हाताळले.

शहरातील दानशूर व्यक्तींना एकत्र करून लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा घरोघरी जाऊन केला. तसेच आरोग्याची काळजी घेण्यासाठी मास्क, सॅनेटायझर, औषधे यांचे वाटप केले. तालुक्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला विकत घेऊन शहरातील गरजूंना पोहोच केला.

शहरात ४० पथकाद्वारे सर्वेक्षण करून नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली. क्वॉरंटाईन व्यक्तींना जेवणाचे डबे, दुर्बल घटकांना फूड पॅकेजचे वितरण अशी कामे केली आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment