कोरोनाचा परिणाम रावण दहनावरही ; संगमनेरमधील सोहळा रद्द

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  यंदा कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घालत अनेकांना घरात बसविले. त्याचे सावट अनेक उत्सवांवर पडले. पंढरीची वारी असो कि गणेशोत्सव असो हे सर्व सध्या पद्धतीने पार पडले.

आता याचा परिणाम यंदाच्या दसरा सणावरही होणार आहे. संगमनेर मध्ये मालपाणी उद्योग समुहाच्या अकोले रस्त्यावरील कारखाना परिसरात असलेल्या शमी वृक्षाचे पूजन करण्यासाठी संगमनेरकर विजयादशमीलामोठी गर्दी करतात.

येथील सिमोल्लंघनाला शतकांची परंपरा आहे. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिमोल्लंघन व रावण दहन सोहळा रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती मालपाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश मालपाणी यांनी दिली.

प्रशासनाच्या सूचनेवरून हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या पाच दशकांहून अधिक काळापासून विजयादशमीच्या निमित्ताने येथे सत्यनारायण महापूजा होते.

परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाच्या सूचनेनुसार यंदाचा विजयादशमी सिमोल्लंघन सोहळा रद्द करण्यात आला आहे. कोरोनाने जनसामान्यांना चांगलेच रखडविले आहे.

सर्वांचे लक्ष सध्या लस कधी येणार याकडे लागले आहे. अद्याप रशियाने आपली लस लॉन्च केली आहे. तर भारतात तीन लशींचे उत्पादन प्रगतीपथावर आहे.

यात ‘सीरम इन्स्टिटयूट’, ‘झाइडसकॅडिला’ आणि ‘भारतबायोटेक’ या तीन कंपन्यांकडून कोरोनाची लस तयार करण्याचे काम सुरू आहे. यातील ‘सीरम इन्स्टिटयूट’ची लस लवकरच येऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment