आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले मदतीचे पॅकेज अतिशय फसवे – आ.विखे पाटील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले मदतीचे पॅकेज अतिशय फसवे आहे.

सरकारने पॅकेजमध्ये घातलेल्या अटीमुळे शेतकर्यांंचा विश्वासघात झाला असून, शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता अधिक असल्याची

प्रतिक्रिया भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.आ.विखे पाटील यांनी शिर्डी मतदारसंघात अतिवृष्टीमुळे नूकसान झालेल्या गावांचा पाहाणी दौरा केल्यानंतर विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधला.

महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असल्याचा आरोप करुन जाहीर केलेल्या मदतीच्या पॅकेजवर त्यांनी नाराजी व्यक्त केली.बांधावर जावून यापूर्वी मदतीबाबत केलेल्या वल्गनाही महाविकास आघाडीचे नेते विसरले असल्याचे त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारच्या मार्गदर्शकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या भूमिका माहीत आहेत.आपती व्यवस्थापन निधीतून केंद्र सरकार निकषाप्रमाणे मदत करेलच, परंतू केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखविण्यापेक्षा राज्य सरकारने दानत दाखवून पुर्वी केलेल्या वक्तव्याप्रमाणे शेतकर्यांंना मदत करायला हवी होती.

परंतू फळबागांना २५ हजार आणि इतर पिकांच्या नूकसानीपोटी १० हजार रुपयांची मदत जाहीर करुन महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याने शेतकर्यामध्ये मोठ्या प्रमाणात संतापाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे आ.विखे पाटील म्हणाले.

सरकारकडून सामान्य माणसाच्या हिताची कोणतीच काम होत नसून मंत्रालयातून फक्त बदल्यांचा कारभार सूरू असून यासाठी मेनू कार्ड तयार करण्यात आल्याची टिका करून आ.विखे पाटील म्हणाले की आज पर्यत झालेल्या बदल्यांना मॅटने स्थगिती देताना आहे

त्याच जागी अधिकार्याना ठेवण्याचा आदेश दिल्याकडे त्यांनी माध्यमांचे लक्ष वेधले.मंत्री बांधावर दिसण्यापेक्षा फक्त पत्रकार परिषदेतूनच दिसत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment