कोरोना योद्ध्यांचे कार्य म्हणजे देशसेवाच : जिल्हाधिकारी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  कोरोना योद्धे हे कोरोना विषाणूच्या विरोधात आपल्या प्राणांची पर्वा न करता लढत आहेत. ही एकप्रकारे देशसेवा आणि देवपूजाच आहे.

हीच आपली संस्कृती आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश भोसले यांनी केले. कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोनाचा समूळ नायनाट व्हावा व समाजातील गरीब,

वंचितांना मदत करणारे स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांचा जिल्हाधिकारी डॉ.राजेश भोसले यांच्या हस्ते कोरोना योद्धा सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

त्यावेळी ते बोलत होते. संपूर्ण जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना विषाणूने बाधित रुग्णांसाठी शिंदे यांनी विविध उपक्रम राबवून मदत केली. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा सन्मान केला.

यावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, सचिन पेंडूरकर उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना शिंदे म्हणाले, कोरोनाचे मोठे संकट आहे.

यावत मात करण्यासाठी आम्ही लढा देत आहोत. हे करत असताना समाजातून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे समाजसेवा करण्यास अधिक बळ मिळते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment