अहमदनगर ब्रेकिंग : ऐन दसऱ्याच्या दिवशी दुर्दैवी घटनेत दोघा भावंडांचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपूर्वीच भगर खाल्याने अनेकांना विषबाधा झाल्याची घटना जिल्ह्यात ताजी असतानाच आज पुन्हा एकदा अशाच घटनेची पुनरावृत्ती घडली आहे. मात्र या दुर्दैवी घटनेत दोघा भावंडांचा मृत्यू झाला आहे.

अन्नातून झालेल्या विषबाधेतून राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील दोन सख्या बहिण भावंडांचा ऐन दसऱ्याच्या दिवशी दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पाथरे बुद्रुक येथे वसिम रज्जाक शेख हे आपल्या कुटुंबीयासमवेत राहतात. त्यांना मुलगा अरहान (वय – ५ वर्षे) व मुलगी आयेशा (वय – ४ वर्षे) ही दोन आपत्ये आहेत.

वसिम यांची सासुरवाडी हणमंतगांव (कोंबडवाडी) हाकेच्या अंतरावर आहे. गत दोन तीन दिवसापासुनही नेहमी प्रमाणे अरहान व आयेशा मामा शाविद यांच्या घरी गेले असता

दरम्यानच्या काळात मामा शाविद व सदर भाचा भाची सह शाविद चे कुटुंबीय यांना दोन दिवसापासून थोडी शारिरीक अस्वस्थता जाणावयाला लागली. त्यांना सोनगांव सात्रळ येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेण्यास सुरुवात केली होती.

परंतु ऐन दसऱ्याच्या दिवशी रविवारी सकाळी ९ च्या दरम्यान अरहान व आयेशा, मामा शाविद व आजी शबाना यांची प्रकृती खालावत चालल्याने नातेवाईकानी त्यांना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

यावेळी तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी मुलगा अरहान यास उपचारापूर्वीच मृत घोषित केले. त्यानंतर अर्ध्या तासाच्या अंतराने मुलगी आयेशा हिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही घटना अन्नातून विषबाधा झाली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूची खरी माहिती समोर येईल.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment