माझा शेवट भाजपातच इोईल  

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरामुळे  भाजपाला काही प्रमाणात फटका बसणार आहे. परंतुपक्ष अत्यंत मजबुत आहे. मी मात्र त्यांच्या कोणत्याही प्रकारे संपर्कात नाही.

माझे राजकारण भाजपातच चालणार असून माझा शेवटही भाजपातच होईल असे स्पष्टीकरण माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी दिले.

नगर तालुक्यातील एका कार्यक्रमा दरम्यान  ज्येष्ठ नेते खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून आता भाजपातील काही दिग्गज नेते त्यांच्या संपर्कात असल्याने याबाबत कर्डिले यांना विचारले असता

त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सध्या बाहेर अनेकजण हातात घड्याळ बांधणार असल्याच्या चर्चा ऐकावयास मिळत आहेत.परंतु आपल्याबाबत चिंता बाळगण्याचे कारण नसल्याचे सांगत आपल मत व्यक्त केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment