सुशांतसिंह राजपूतच्या खुनाच्या आरोपाखाली आदित्य ठाकरे गजाआड जाणार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या खुनाच्या आरोपाखाली आदित्य ठाकरे गजाआड जाणार, ही केस अजून संपलेली नाही. अशा शब्दांत भाजपा नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आज प्रतिहल्ला चढवला.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आमचे हात स्वच्छ असल्याचं सांगताना भाजपा नेत्यांचं नाव न घेता त्यांनी ठाकरे कुटुंबावर शेण खाऊन गोमुत्राच्या गुळण्या केल्याचं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं होतं.

त्याला राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काल उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात मुलगा आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना सीबीआय प्रकरणी स्वतःहून क्लीनचीट दिली, आश्चर्य आहे.

सीबीआयचा अंतिम अहवाल अद्याप आलेला नाही आणि हे म्हणतात आमचे हात स्वच्छ आहेत. सुशांतची आत्महत्या नाही, तर तो खूनच आहे.

खूनाचे आरोपी आज ना उद्या गजाआड जातील. त्यात एक मंत्रीही असेल आणि तो यांचा मुलगा असेल,” अशा शब्दांत राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार केला

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment