ऊर्जामंत्री केवळ नामधारी; माजी आमदार कर्डीले यांचा मंत्री तनपुरेंवर घणाघात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-  आपल्या मोठं मोठ्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी नुकतेच ऊर्जामंत्र्यांवर चांगलीच टीका केली आहे.

यावेळी बोलताना त्यांनी मंत्री तनपुरेंना केवळ नामधारी असल्याचा टोला लगावला आहे. कर्डीले बोलताना म्हणाले कि, उर्जामंत्री केवळ नावालाच आहेत. शेतकरी माझ्याकडेच विजेबाबतच्या तक्रारी घेऊन माझ्याकडे येत आहेत.

मी त्यांचे प्रश्न सोडवितो. ऊर्जामंत्री घाटावरील गावांवर फिरकत नाहीत. त्यांच्या मतदारसंघातच त्यांना कामे करता येत नसतील, तर ही बाब योग्य नाही.

उर्जामंत्र्यांनी आता शेतकऱ्यांच्या बांधावर जायला हवे. विजेचे प्रश्न सोडविले पाहिजे, असे टोला त्यांनी तनपुरे यांना लगावला. राहुरी विधानसभा मतदारसंघात मी दहा वर्षे प्रतिनिधीत्त्व केल्यामुळे मी अनेक कामे करू शकलो.

त्यामुळे लोक माझ्याकडेच प्रश्न घेऊन येतात. नगर तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांना खेळते भांडवल वाटप करताना त्यांनी तनपुरे यांचा समाचार घेतला. कर्डिले म्हणाले, की अतिवृष्टीमुळे सध्या शेतकरी अडचणीत आहे.

अशा वेळी त्यांना कोणीतरी मदतीची गरज आहे. त्यामुळेच जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्याचा निर्णय घेतला.

खेळते भांडवल म्हणून हे कर्ज दिले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. शेतकऱ्यांसाठी केंद्राच्या माध्यमातून विविध योजना दिल्या जात आहेत.

अल्पभुधारक शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यायला हवा. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून शेतीला पूरक उद्योगांची जोड दिली पाहिजे, असे कर्डिले यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment