जमीन वाटपाच्या वादातून पती-पत्नीस मारहाण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- जमीन वाटपाच्या कारणावरून पती रमेश निकम व शालिनी निकम यांना गज- कुऱ्हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा घटना तालुक्यातील सुरेगाव येथे घडली असून याबाबत आरोपी दिलीप दिनकर निकम, मोतीराम दिनकर निकम, भूषण दिलीप निकम, सर्व सुरेगाव यांच्यावर फिर्यादी शालिनी निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.

सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत फिर्यादी महिला शालिनी व तिचा पती रमेश निकम हे राहतात. त्यांचे जमिनींचे वाटप करण्यावरून आपापसात वाद आहेत.

या वादाचे रूपांतर नुकतेच भांडणात झाले व फिर्यादी महिलेचे सासरे दिनकर बच्चन निकम यांच्या नावावर असलेल्या शेतजमिनीचे वाटप अद्याप बाकी आहे. फिर्यादी महिलेचा पती व अन्य आरोपी हे भाऊ-भाऊ आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment