जिल्हयाला वरदान ठरलेल्या ‘त्या’ धरणांमधून जायकवाडीला विसर्ग सुरूच

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात यंदाच्या वर्षी पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. यामुळे अनेक धरणे, नद्या, ओढे, बंधारे हे ओव्हरफ्लो झाल्याचे चित्र नगर जिल्हात दिसून आले.

यामुळे पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न देखील सुटला आहे. यामुळे नगरकरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असल्याने जिल्ह्याला वरदान ठरलेली धरणे हि तुडुंब भरून वाहू लागली आहे.

यामध्ये भंडारदरा, निळवंडे आणि मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात यंदा पावसाचे प्रमाण सरासरीच्या तुलनेत अधिक स्वरूपात राहिले.

यामुळे या धरणांमधून जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून कमी अधिक प्रमाणात विसर्ग जायकवाडीच्या दिशेने सुरूच होता तो आजही कायम आहे.

लाभक्षेत्रातील पर्जन्य आणि वरील तीनही धरणांतून सोडलेला विसर्ग याचा विचार करता आत्तापर्यंत प्रवरेतून जायकवाडीच्या दिशेने तब्बल 40 टीएमसी इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेले आहे.

वरील धरणांतून विसर्ग सोडण्याआधी लाभक्षेत्रात पडलेल्या पावसाचे सहा टीएमसी इतके पाणी प्रवरेतून जायकवाडीसाठी वाहिले होते. 2006 सालानंतर पहिल्यांदाच जायकवाडीला इतके पाणी विसर्गाच्या रूपाने वाहिले आहे.

गेल्या चौदा वर्षातला हा नवीन विक्रम आहे. गुरुवारी ‘मुळा’तून 5 हजाराने सुरू असलेला विसर्ग शनिवारी चार हजाराने घटवून 1 हजार क्युसेक करण्यात आला होता.

तर निळवंडे धरणातील विद्युतगृहातून 650 क्युसेकने पाण्याचा विसर्ग प्रवरेत सुरू आहे. भंडारदरामधून मात्र विसर्ग बंद आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment