या मंत्र्याच्या धक्कादायक वक्तव्यांनी जिल्ह्यातील राजकारणात माजली खळबळ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात सध्या सुरु असलेले राजकारण हे चांगलेच गाजू लागले आहे. यातच जिल्ह्यातील एका मंत्र्यांच्या धक्कादायक वक्तव्यामुळे आता तर जिल्ह्यातील राजकारणामध्ये चांगलीच खळबळ माजली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत, असा गौप्यस्फोट राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला. तनपुरेंच्या गौप्यस्फोटाने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास कोण-कोण उत्सुक आहेत त्यांचे नावे वेळ आल्यावर मी नक्की सांगेन, असंही तनपुरे म्हणाले आहेत.

त्यामुळे नगर जिल्ह्यातून राष्ट्रवादीत कोण कोण प्रवेश करणार याचे आडाखे बांधायला सुरुवात झाली आहे. तसंच जे नाराज नेते आहेत त्यांची राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची इच्छा आहे, असा दावा मंत्री तनपुरे यांनी केला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment