नगर-मनमाड महामार्गावरील खड्ड्याने पुन्हा एकाचा घेतला बळी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- नगर-मनमाड महामार्गावरील खड्ड्याने पुन्हा एकाचा बळी घेतला. या अपघातांना सार्वजनिक बांधकामच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कारणीभूत ठरल्याचा आरोप करत

रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा; अन्यथा ग्रामस्थ आंदोलन छेडतील, असा इशारा पिंपरी अवघडचे माजी सरपंच सुरेश लांबे यांनी दिला.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाजवळ रविवारी दुपारी झालेल्या अपघातात पिंपरी अवघड येथील बापूसाहेब वाडेकर यांचा मृत्यू झाल्याने पिंपरी अवघड व वरशिंदे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

वाडेकर हे विद्यापीठातील मजूर ठेकेदार होते. त्यांची मोटारसायकल खड्ड्यात गेल्याने हा अपघात झाला. रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.

या रस्त्यावर अपघातांची मालिका गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. दीड महिन्यात तीन घटनांत राहुरी तालुक्यातील तिघांचा मृत्यू झाला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment