… तर जनता माफ करणार नाही ; ‘ह्या’ शेतकरी नेत्याचा आ. लहामटे यांना इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- महाराष्ट्रामधील २०१९ चे राजकारण सर्वानीच पहिले. अनेक प्रस्थापितांचे वर्चस्व या निवडणुकीमध्ये कमी झाले. अकोले तालुक्यातही असेच झाले. अकोले तालुका विधानसभेची पिचड घराण्याची ४० वर्षांची एकहाती सत्ता संपुष्टात आली.

ही किमया आम जनतेने करून दाखविली. आता कष्ट करणारे उपाशी आणि ऐतखाऊ तुपाशी ही स्थिती बदलून तालुक्यात विकासात्मक बदलाची परिचिती यावी असे काम आमदार लहामटे यांनी करून दाखवावे.

घराणेशाही, सरंजामशाही विरोधात येथील राजकारण असून अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर जनता माफ करणार नाही, असा इशारा ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी दिला.

शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजय वर्षपूर्ती सोहळ्यात सावंत बोलत होते. निसर्ग पर्यटनक्षेत्राचा विकास, रोजगारासाठी होणारी भटकंती थांबविणे व सरकारी सुसज्ज आरोग्यसुविधा उपलब्ध होणे ही तालुक्याच्या जनतेची खरी भूक आहे.

त्यासाठीच परिवर्तन घडले हे लक्षात घेऊन विकासात्मक बदल घडून दाखवा मगच विजयाचा ढोल वाजवा. जमिनीवर पाय ठेवून आर्थिक विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न करताना तालुक्यातील सामाजिकएकीची घडी बिघडू देवू नये, असा सल्लाही सावंत यांनी आमदार किरण लहामटे यांना दिला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment