ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंबाबत फिरणारी ती पोस्ट निरर्थक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- नवरात्रीच्या कार्यक्रमाची सांगता करताना अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यामध्ये हजारे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

तसेच पुढे बोलताना हजारे म्हणाले कि, गावाच्या रोजच्या कामात लक्ष घालणे हळूहळू कमी करत आहे, यामुळे हजारे निवृत्त होणार असल्याची चर्चा पसरली.

मात्र हे वृत्त निरर्थक असल्याचे गावकऱ्यांनी म्हंटले आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या गावकर्‍यांसमोरील एका भाषणाचा संदर्भ देत हजारे आता गावाच्या कामातून निवृत्ती घेणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांतून आणि समाज माध्यमांतून सुरू झाल्या आहेत.

मात्र, हजारे अशा पद्धतीने कधीच निवृत्ती घेणार नाहीत, असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे हजारे यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचेही गावकर्‍यांचे म्हणणे आहे.

अण्णांच्या कार्याने प्रेरित होऊन गावातील अनेक तरुण कार्यकर्ते पुढे आले आहेत. त्यांनी गावासाठीचे काम नेटाने पुढे सुरू ठेवले आहे. आता कार्यकर्ते हिंमतीने काम करताना पाहून आनंद वाटतो.

युवा कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आण्णा असे म्हंटले असल्याचे ग्रामस्थ बोलत आहे. त्यामुळे ही निवृत्तीची घोषणा नाही, असे कार्यकर्त्यांचे मत आहे.

शिवाय हजारे स्वत:ला चळवळीतील कार्यकर्ता मानतात. त्यांच्या विचारानुसार कार्यकर्ता कधीही निवृत्त होत नसतो. त्यामुळे हजारे अशी कोणतीही निवृत्ती घेतील, याची अजिबात शक्यता नाही.

यासंबंधी पसरत असलेल्या बातम्यांवर हजारे यांनी केवळ स्मितहास्य करून हेच संकेत दिल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment