नोव्हेंबर मध्ये ‘इतक्या’ दिवस राहणार बँका बंद ; जाणून घ्या तारखा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- येत्या दोन दिवसांत नोव्हेंबर महिना सुरू होईल. नोव्हेंबर महिन्यात अनेक सण उत्सव येतात. अशा परिस्थितीत लोकांना आतापासून त्यांच्या बँकेसंबंधी माहिती मिळवणे आवश्यक आहे जेणेकरुन कोणतेही आवश्यक काम थांबू नयेत.

ऑक्टोबरप्रमाणेच सणासुदीच्या हंगामामुळे नोव्हेंबरमध्ये बऱ्याच दिवस बँकेची सुट्टी असेल. अशा परिस्थितीत ग्राहकांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी त्यांचे काम वेळेत पूर्ण केले पाहिजे.

नोव्हेंबर २०२० मध्ये दीपावलीचा महत्त्वाचा उत्सव असून साप्ताहिक सुट्ट्याही असतात, त्यामुळे बँका बंदच राहतील. दीपावलीशिवाय नोव्हेंबरमध्ये गुरु नानक जयंती देखील आहे.जाणून घेऊयात डिटेल्स –

ऑनलाइन सेवा व एटीएम सेवा सुरूच राहील :- नोव्हेंबरमध्ये बँका सर्व रविवारी आणि महिन्यात येणाऱ्या दुसर्‍या शनिवारी बंद असतात. बँक बंद असताना इतर सर्व ऑनलाइन सेवा आणि एटीएम संबंधित सेवा सुरू राहतील.

जर बँकेच्या शाखेत कोणत्याही बँकिंग कामानिमित्त जायचे असल्यास त्या दिवशी बँकेची सुट्टी आहे का ? हे आपल्याला माहित असले पाहिजे.

नोव्हेंबर 2020 मध्ये आरबीआयने बँकांच्या सुट्यांच्या यादी जाहीर केल्या आहेत. या नोव्हेंबरमध्ये, रविवार, दुसरा शनिवार आणि स्थानिक सुटीसह सुमारे 8 दिवस बँका बंद असतील.

* ‘ह्या’ तारखेस बँक राहणार बंद

  • 1 नोव्हेंबर – रविवार
  • 8 नोव्हेंबर – रविवार
  • 14 नोव्हेंबर – दूसरा शनिवार / दीपावली पर्व
  • 15 नोव्हेंबर – रविवार
  • 22 नोव्हेंबर – रविवार
  • 28 नोव्हेंबर – चौथा शनिवार
  • 29 नोव्हेंबर – रविवार
  • 30 नोव्हेंबर – गुरु नानक जयंती

टीप :- आपण भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) वेबसाइटवर सुट्टीची यादी पाहू शकता. तसेच, बँकेतल्या सुट्ट्या प्रत्येक राज्यानुसार बदलतात.

ज्या स्थानिक राज्यांत सुट्टी आहे अशा राज्याशिवाय इतर राज्यात बँकिंग सुरु राहील. आपण इच्छित असल्यास, खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण सुट्टीची यादी पाहू शकता. https://www.rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment