ब्रेकिंग न्यूज! अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकातील सात कर्मचारी निलंबित

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील पोलीस प्रशासन गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत राहिले आहे. अचानक काही पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या तर काहींची उचलबांगडी करत त्यांना इतरत्र बदली करण्यात आले.

या घटना ताज्या असतानाच पोलीस दलातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक व सात पोलीस कर्मचार्‍यांवर गैरवर्तनाचा ठपका ठेवून त्यांना निलंबित केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश काढले आहे.

दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांनी बेकायदेशीररित्या डिझेलची वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई केली होती. या कारवाईची चौकशी सुरू आहे. यात राठोड यांची तडकाफडकी बदली आणि त्यांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप चर्चेत आली असताना

त्यांनी स्थापन केलेले विशेष पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली. तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. राठोड यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाईसाठी विशेष पथकाची स्थापना केली होती. या पथकाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुटखा, अवैध धंदे, जुगार, मटका, क्लब, गोमांस आदीवर कारवाई केली.

या कारवाईपेक्षा त्यातील वेगळ्या गोष्टींसाठी हे पथक चर्चेत आले. निलंबनासाठी हे प्रकरण ठरले कारणीभूत जीपीओ चौकात अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. राठोड यांच्या विशेष पथकाने बेकायदेशीररित्या डिझेलची वाहतूक करणारी वाहने पकडली होती. यानंतर संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल करणास विलंब झाला होता.

श्रीरामपूरचे उपअधीक्षक राहुल मदने यांना चौकशीचे आदेश दिले होते. अप्पर अधीक्षक डॉ. राठोड यांनी विषेश पथक स्थापन करून जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर छापेमारी सुरू केली होती. परंतू, महिन्याच्या आत डॉ. राठोड यांची बदली झाली आहे. तर चौकशी दरम्यान विशेष पथकातील उपनिरीक्षकांसह सात कर्मचार्‍यांवर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment