Ahmednagar News

स्वतःच्या घरात चोरी करणाऱ्या मुलास गोव्याची किनारी पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- घरी कोणी नसल्याचा फायदा घेत स्वतःच्या घरात चोरी करून तब्बल सव्वातीन लाखांचा मुद्देमाल चोरणार्‍या व मित्राच्या मदतीने नाशिकमध्ये ते विकणार्‍या दोघांना अखेर शहर पोलिसांनी थेट गोव्यातील समुद्र किनार्‍यावरुन ताब्यात घेतले आहे.

दरम्यान याबाबत घडलेली घटना अशी कि, 20 ऑक्टोबर रोजी मालदाड रोड परिसरात असलेल्या विद्युत वसाहतीत राहणार्‍या संजय डमरे यांच्या पोटच्या मुलाने आपल्याच घराचा दरवाजा उचकाटून

आपल्या जन्मदात्या आईचे 2 लाख 82 हजार 500 रुपये किंमतीचे दहा ताळ्यांचे दागिने, 25 हजार रुपये किंमतीची होन्डा कंपनीची दुचाकी (क्र.एम.एच.15/बी.बी.5701) व पाच हजार रुपये किंमतीची पॉवर बँक आणि तीन घड्याळे असा एकूण 3 लाख 12 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरुन पोबारा केला होता.

हा सर्व मुद्देमाल त्याने त्याचा मित्र व त्याच्या पत्नीच्या मदतीने नाशिकमध्ये विकल्याचा आरोप आरोपीच्या आईने केला होता. याबाबत त्यांनी 21 ऑक्टोबर रोजी शहर पोलीस ठाण्यात आपला मुलगा आतिष, त्याचा मित्र सुरज वाघ आहण त्याची पत्नी निकिता वाघ अशा तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती.

त्यानुसार शहर पोलिसांनी या तिघांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान लुटीच्या मालातून आरोपी गोव्याची ट्रिप एन्जॉय करत होते.

दोन दिवस तेथे कसून तपास केल्यानंतर अखेर आतिष डमरे आणि त्याचा जोडीदार सुरज वाघ हे दोघेही गोव्यातील समुद्र किनार्‍यावरील प्रसिद्ध कलिंगुड बीचवर असल्याचे पोलिसांना समजले. गोवा पोलिसांच्या मदतीने बीचवरच त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button