चोरीच्या घटना सुरूच; गाडीच्या डिक्कीतून दीड लाखांची रोकड लंपास

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात चोरीच्या घटनांविरोधात पोलीस पथक जेवढे सक्रिय होत आहे तेवढ्याच तुलनेत चोरीच्या घटनांमध्ये देखील वाढ होत आहे.

नुकतीच संगमनेर शहरातील अकोले रोड येथे विजय दत्तात्रय सांगळे यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून तब्बल दीड लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, किराणा मालाचे व्यावसायिक असलेले विजय सांगळे हे संगमनेर तालुक्यातील हंगेवाडी याठिकाणी राहतात.

ते दुपारच्या सुमारास आपल्या दुचाकी वरून संगमनेर शहरातील जाणता राजा मैदानाजवळ असलेल्या कोटक महिंद्रा बँक जवळ येऊन त्यांनी आपल्या खात्यातून १ लाख ४० हजार रुपयांची रोख रक्कम काढली.

हि सर्व सर्व रक्कम त्यांनी गाडीच्या डिक्कीत ठेवली. त्यानंतर ते अकोले रोड येथील गलांडे प्लंबिंग या दुकानामध्ये काम असल्याने गेल्याने त्याचवेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने सांगळे

यांच्या दुचाकीतील डिक्की तोडून त्यातील रक्कम लंपास केली. सांगळे हे दुकानातून आले असता त्यांना डिकी उघडी दिसली. त्यात त्यांना पैसे दिसले नाही ते घाबरून गेले.

पैसे चोरी गेले असल्याचे लक्षात आले. याप्रकणी विजय सांगळे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यानविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment