महावितरणच्या भोंगळ कारभाराचा ग्राहकांना होतोय मनस्ताप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-महावितरण आणि त्यांच्या समस्यां या नागरिकांसाठी नेहमीच मनस्ताप ठरत असतात.

आधीच कोरोनामुळे आर्थिक हतबल झालेल्या नागरिकंना आता महावितरणच्या चुकीचा आर्थिक भार सहन करण्याची वेळ आली आहे.

संगमनेर तालुक्यात विज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. बोगस मीटर रेडींग नोंदवून ग्राहकांकडून दामदुप्पट विजेच्या बिलाची आकारणी होत असल्याचे प्रकार तालुक्यातील निमोण गटातील गावांमध्ये होत आहे. यामुळे ग्राहकांमधून संताप व्यक्त होत आहे.

नागरिकांची पिळवणूक करत विज वितरण कंपनीकडून ग्राहकांना बोगस बिले पाठविली जात आहे. बंद असलेल्या घरात विजेचा वापर नसतांनाही अशा विज ग्राहकांना तब्बल पाच हजार रुपयांचे बिल पाठविण्यात आले आहे.

या ग्राहकाच्या मीटरचे रेडींग न घेता बोगस बिल आकारण्यात आले.काहीजणांनी विज बिलाचा पूर्ण भरणा करुनही त्यांनाही बोगस बिले पाठविले जात आहे.

या ग्राहकांनी विज वितरण कंपनीच्या निमोण येथील उपकेंद्रात तक्रार केली असता त्यांचे बिल तातडीने कमी करुन देण्यात आले. विज वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांच्या या अनागोंदी कारभारामुळे ग्राहकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment