अवैध गुटख्याच्या धंद्यावर नियंत्रण मिळवण्यात येथील पोलिसांना आले अपयश

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून पोलीस प्रशासनाने गुटखा, तंबाखू, पानमसाला आदी तस्करी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. यामुळे अनेक ठिकाणी हा व्यवसाय चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

मात्र जिल्ह्यातील एका तालुक्यात या पदार्थांवर कारवाई करण्यात पोलीस प्रशासनाला अपयश येत असल्याचे दिसून येत आहे.

श्रीगोंदा तालुक्यात अवैध दारू विक्रीवर कारवाईसाठी तसेच गुन्हेगारी कमी करण्यासाठी विविध पथके काम करत असली तरी तालुक्यातील अवैध गुटख्याच्या धंद्यावर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांसह अन्न औषध प्रशासनाला फारसे यश आले नसल्याने शहरासह तालुक्यातील विविध गावांत गुटख्याच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे.

यातच पान टपर्‍यांवर राजरोसपणे गुटखा विक्री होत असताना या टपर्‍यांपर्यंत होलसेल दरात विक्रीस बंदी असलेला गुटखा पोहोच देणारी यंत्रणा कार्यरत आहे. नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी राज्य सरकारने गुटखा बंदीचा चांगला निर्णय घेतला असला तरी परराज्यातून गुटखा विक्रीसाठी ग्रामीण भागात येत आहेत.

आपल्या राज्यात बंदी असलेल्या गुटखा, पानमसाला, स्वादिष्ट, सुगंधित तंबाखू, स्वादिष्ट, सुगंधित सुपारी, खर्रा इत्यादींची कोणीही विक्री करीत असेल तर त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवून फौजदारी खटला भरला जाऊ शकतो.

त्यामुळे राज्य सरकारने काढलेल्या बंदीचा आदेश मोडून कोणीही अशा पदार्थांची विक्री करत असेल तर त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा अन्न व औषध प्रशासन (एफडीए) कारवाई करते.

मात्र याविभागाकडे असणारी तोकडी यंत्रणा आणि याशिवाय असलेली असंख्य कामे यामुळे अन्न औषध प्रशासनाचे काम पोलीस यंत्रणेकडे अधिक येत आहे. मात्र या गुटखा विक्रेत्यांवर पोलिसांकडून अपेक्षित कारवाई केली जात नसल्याचे दिसून येत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment