पुणे -संगमनेर- नाशिक या देशातील पहिल्या सेमी हायस्पीड रेल्वे मार्गावर 18 बोगदे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-नाशिक आणि पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. या दोन्ही महानगरांदरम्यान देशातील पहिली सेमी हायस्पीड रेल्वे धावणार आहे. नाशिक-पुणे दरम्यान रेल्वे सेवा सुरु करण्याची ही अनेक वर्षांची मागणी आता प्रत्यक्षात येणार असून या कामाला लवकरच मुहूर्त लागणार आहे.

या मार्गावरील तब्बल 24 किमी लांबीचा प्रवास 18 बोगद्यांतून करावा लागणार आहे. बोगद्यांच्या या कामासाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया महारेलने आता सुरू केली आहे. मुंबई – पुणे आणि नाशिक ही तीन झपाट्याने वाढणारी शहरे गोल्डन ट्रँगल म्हणून ओळखली जातात. या शहरांमधला प्रवास वेगवान व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

पुणे, संगमनेर आणि नाशिक या शहरांना जोडण्यासाठी परंपरागत पद्धतीच्या रेल्वे मार्गासह सेमी हायस्पिड रेल्वे सुरू केली जाणार आहे. जून, 2020 मध्ये रेल्वे बोर्डाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आता महारेलने तयारी सुरू केली आहे.

घाट सेक्शनमधिल बोगद्यांच्या कामांसाठी कंत्राटदारांकडून स्वारस्य देकार दोन दिवसांपूर्वी मागविण्यात आले आहेत. त्यानुसार या मार्गावर 18 बोगदे तयार करण्याचे नियोजन असून त्यांची किमान लांबी 180 मीटर आणि कमाल लांबी 6.64 किमी असेल.

235 किलोमीटरचा हा लोहमार्ग असणार आहे सेमी हायस्पीड रेल्वे बरोबरच सध्याची प्रवासी आणि मालगाडी धावण्यासाठी ही मार्गाची निर्मिती केली जाणार असून ब्रॉडगेज मार्गावर सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग पहिल्यांदाच तयार केला जाणार आहे. पुणे, चाकण, मंचर, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर, नाशिक असा हा मार्ग असून 24 थांबे असणार आहेत.

यासाठी पुणे-नाशिकला अतिरिक्त रेल्वे स्थानकाची देखील निर्मिती केली जाणार आहे. नाशिक पुणे आणि नगर या तीन जिल्ह्यातून हा मार्ग असणार आहे. त्यात मळती मीडिया हब, मॉल्स माल वाहतूक टर्मिनल उभारले जाणार असून रोजगाराची निर्मितीही होणार आहे. पुणे ते हडपसर हा मार्ग एलिव्हेटेड असणार आहे.

रेल्वे फटाकवर क्रॉसिंगची समस्या टाळण्यासाठी 41 उड्डाण पूल आणि 128 भुयारी मार्ग असणार आहेत. रेल्वेची प्रवास प्रतितास 200 ते 250 किलोमीटर प्रतितास इतका जलद गतीने होणार असल्यान अवघ्या पावणे दोन तासात नाशिक ते पुणे अंतर कापता येणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment