आता बिबट्याचा शोध घेण्यासाठी आता ड्रोनचा वापर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-पाथर्डी तालुक्यातील मढी केळवंडी याठिकाणच्या दोन  चिमुकल्यांना बिबट्याने भक्ष केल्यानंतर वन विभाग सतर्क झाला असून बिबट्याचा शोध घेण्यासाठी व त्याला पकडण्यासाठी वन विभागाने जळगावहुन स्पेशल पथक बोलावले असुन

ड्रोनद्वारे बिबट्याचा शोध घेतला जात असल्याची माहीती तिसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघूलकर यांनी दिली आहे .मढी सावरगावघाट परिसरात सहा पिंजरे तसेच सहा अधूनिक पध्दतीचे स्पॉटकॅमेरे ठिकठिकाणी लावलेले

असुन या कॅमेऱ्याद्वारे बिबट्याच्या हालचाली समजू शकतात तसेच जळगावहुन एक पथक बोलावण्यात आले असुन ते पथक ड्रोनद्वारे किमान दोन ते तीन किलोमिटरच्या परिसरातील हालचालींचा अचूक वेध घेत आहे.

बिबट्याचा तपास व त्याला पकडण्यासाठी वन विभाग प्रयत्नशील आहे . असे असले तरी जिल्हा उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यांमध्ये विशेषतः डोंगर पायथ्याशी असणाऱ्या

गाव वाड्यावर जनजागृती अभियान देखील हाती घेतले असून गावांमध्ये तसेच वास्त्यावर राहणाऱ्यांनी बिबट्यासह इतर वन्यप्राण्यांच्या बाबतीत नागरीकांनी सावधानता बाळगावी.

तसेच वाघ बिबटया तरस लांडगा कोल्हा या प्राण्यांच्या ठस्याबाबत अथवा हालचालीबाबत ठिकठिकाणी पोस्टर लावून तसेच गावागावात जनजागृती करण्यासाठी

वाहने फिरवून त्याद्वारे नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आव्हान केले जात आहे. विशेषता वस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांसाठी वनविभागाने विशेष मार्गदर्शन मोहीम देखील हाती घेतलेली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment