आतापर्यंत जिल्ह्यात ५५ हजार ९०० रुग्ण आढळून आले, तर इतक्या जणांचा कोरोनामुळे मृत्यू !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-गुरूवारी दिवसभरात जिल्ह्यात नवे २६५ रुग्ण आढळले. तीन महिन्यांपूर्वी दररोज ५०० ते ९०० रुग्ण आढळत होते. २४ तासांत सहा जणांचा मृत्यू झाला. यापूर्वी दररोज १७ ते २५ जणांचा बळी जात होता.

दरम्यान, आतापर्यंत ५३ हजार ५७९ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. गुरूवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ६०, खासगी प्रयोगशाळेत ५३ आणि अँटीजेन चाचणीत १५२ बाधित आढळले.

सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १ हजार ४६२ झाली आहे. जिल्हा रुग्णालयात मनपा हद्दीतील ३२, जामखेड २, नगर ग्रामीण २, पाथर्डी ११, राहाता २, राहुरी २, शेवगाव १, श्रीगोंदे ५, कॅन्टोन्मेंट २, मिलिटरी हॉस्पिटल १ रुग्णाचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत मनपा २०, अकोले १, जामखेड १, कर्जत ३, कोपरगाव १, नगर ग्रामीण ३, नेवासे २, पारनेर १, राहाता ३, राहुरी ५, संगमनेर १०, श्रीगोंदे २, श्रीरामपूर १ रुग्णाचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत मनपा ५,

अकोले ७, जामखेड १७, कर्जत १२, नगर ग्रामीण १९, नेवासे १, पारनेर ११, पाथर्डी २१, राहाता १५, राहुरी ५, संगमनेर २१, शेवगाव ११, श्रीगोंदे ७ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५५ हजार ९०० रुग्ण आढळून आले, तर ८५९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

 

Leave a Comment