पोलिसांकडून कारवाई सुरु; मात्र तरीही या तालुक्यात अवैध धंदे जोरात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे जोरात सुरु आहे. या धंद्यांना रोख बसावा यासाठी पोलिसांकडून देखील सातत्याने कारवाई केली जात आहे.

मात्र तरीही जिल्ह्यात या धंद्यांना आळा घालण्यात पोलीस प्रशासनाला अपयश येत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील गावोगावी बंदी असलेला गुटखा राजरोस पणे विक्री होत असताना या खालोखाल अवैध दारू धंद्याने देखील डोके वर काढले आहे.

केवळ स्थानिक गुन्हे शाखेचे पथकापासून स्थानिक पोलीसांपर्यंतचे अधिकारी आणि पथक हे वारंवार कारवाईसाठी जात आहे. मात्र तरीही तालुक्यातील अनधिकृत धंदे जोरात सुरु आहे.

शहरासह तालुक्यात असलेले ढाबे आणि हॉटेलमध्ये सर्रासपणे देशी आणि विदेशी दारू विक्री होत आहे. वाईन्स आणि परमीट रुम बियरबार हे थोडेच आहेत.

त्यात मद्य पिण्याचा परवाने असलेले व्यक्ती तालुक्यात बोटावर मोजता येतील एवढेच असले तरी दारू पिणार्‍यांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत आहे.

दारू पिऊन गाडी चालवणे ,अधिक दारूच्या आहारी गेलेले अनेकजण कुटुंबासह आसपासच्या परिसरात अशांतता पसरवत आहेत.

यातच गुन्हेगारी वाढतअसल्याने या अवैध दारूचा व्यवसाय बंद होणार कसा हा मोठा प्रश्न आहे.दोन्ही नवीन अधिकार्‍यांचा धाक वाळू तस्करांनाच जिल्ह्यात नव्याने आलेले जिल्हा पोलीस अधीक्षक ,

आणि जिल्हाधिकारी यांनी पदभार घेतल्यापासून तालुक्यातील बहुतांशी नद्यानाले, ओढे यातून उपसा होणारी अवैध वाळू मात्र सध्या बंद आहे. मात्र इतर अवैध व्यवसाय डोके वर काढत असल्याचे दिसतेय.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment