भाजपमधील ‘तो’ वाद चिघळला ; आता जिल्हाध्यक्षांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील भाजपच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. बुथ प्रमुखांच्या मताला कवडीचीही किमत न देता श्रीरामपूर शहर व तालुका मंडलाच्या अध्यक्ष पदाच्या नियुक्त्या केल्याच्या निषेधार्थ सर्व बुथ प्रमुखांनी राजीनामे दिल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

जिल्हाध्यक्ष गोंदकर यांच्याबाबत श्रीरामपुरात रोष दिसून आला. या निवडीच्या निषेधार्थ या मतदार संघातील 231 बुथ प्रमुखांपैकी 213 बुथ प्रमुख तसेच 44 शक्ती केंद्र प्रमुख अशा एकूण 257 प्रमुखांनी आपल्या पदाचे सामुहिक राजीनामे दिले.

परंतु आता यावर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी सांगितले की, श्रीरामपूर भाजपच्या कार्यकारिणी निवडीत माझी एकट्याची भूमिका नाही. पक्षाने प्रदेशस्तरावरून या निवडी केल्या असून पक्षातील प्रामाणिक लोकांना त्यात स्थान देण्यात आले आहे. पक्ष संघटनेत आरोप प्रत्यारोप होत असतात.

मात्र लवकरच मतभेद दूर होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गोंदकर यांच्या निवडीच्या निषेधार्थ स्वयंवर मंगल कार्यालयात मेळावा आयोजित केला होता. त्यात नगरसेवक किरण लुणिया व अभिजित कुलकर्णी यांनी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्यावर गंभीर आरोप केले. कार्यकारिणी निवडीत निष्ठावंतांना डावलण्यात आले.

ज्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष वाढविला त्यांना कोणतेही स्थान देण्यात आले नाही. जिल्हाध्यक्ष गोंदकर यांनी श्रीरामपुरात पक्ष संपविला असा आरोप यावेळी करण्यात आला. गोंदकर म्हणाले, श्रीरामपुरातील कार्यकारिणीमध्ये निवडले गेलेले पदाधिकारी हे संघटनेतील आहेत.

कोणीही बाहेरचा कार्यकर्ता नाही. निवडीचे अधिकार एका व्यक्तीला दिलेले नसतात. सामूहिकपणे निवड प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामुळे माझ्या विरूद्ध करण्यात आलेले आरोप निराधार आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment