विकास आराखडा तयार करून कामे सुरु केली : स्वप्निल शिंदे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- कुठलेही विकास कामे करीत असताना नियोजनाची खरी गरज आहे. यासाठी नागरिकांना बरोबर घेऊन प्रभागाचा विकास आराखडा तयार करून विकासकामे सुरु केली पाहिजेत.

अन्यथा जनतेच्या पैशाचा अपव्यव होण्याची शक्यता असते. भूमिगत ड्रेनेज व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकणे गरजेचे आहे. कोणतेही नियोजन न करता आधी रस्ते, नंतर ड्रेनेज व पाईपलाईन अशी कामे केल्यामुळे जनतेच्या पैशाच्या अपव्यय मोठ्या प्रमाणात होताना दिसते.

त्यामुळे कामांचे प्राधान्यक्रम ठरवून नियोजनपूर्वक विकास कामे केल्यास जनतेच्या पैशाची बचत होऊन कायमस्वरुपी व दीर्घकाळ टिकाणारी कामे उभी राहू शकतील.ठेकेदाराने उत्कृष्ट दर्जाची कामे करुन समाजाचा विश्वास निर्माण करावा. असे प्रतिपादन सभागृह नेते स्वप्निल शिंदे यांनी केले.

प्रभाग क्र. ४ मध्ये सागरिका होसिंग सोसायटी येथे रस्ता कॉक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करित असताना स्वप्निल शिंदे.समवेत अमित गटणे, दत्तात्रय हारदे, भानुदास साबळे, मारुती खुळे, स्वप्निल साबळे, अविनाश हारदे, अभिमन्यू साबळे, कुणाल लगड, संकेत खुळे,

अभिजित धापटकर, रवींद्र लगड, गौरव म्हस्के, राहुल पानसरे आदी उपस्थित होते. यावेळी दत्तात्रय हारद म्हणाले की, स्वप्निल शिंदे यांनी प्रभागातील विकास कामे करित असतानाआमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना विश्वासात घेऊन कामे केली.

प्रभाग ४ हा विकास कामातून भविष्यकाळात मॉडेल प्रभाग म्हणून ओळखला जाईल. या प्रभागाच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असते. विकास कामे करीत असताना प्रबागातील नागरिकांचाही त्या कामाकडे लक्ष असणे गरजेचे आहे. असे ते म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment