मोठी बातमी : राष्ट्रवादी व शिवसेनेमधील नेत्यांमधील वाद संपुष्टात येण्याऐवजी…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- राज्यात राष्ट्रवादी शिवसेनेची महाविकासआघाडीची सत्ता असताना शहरातील राष्ट्रवादी व शिवसेनेमधील नेत्यांमधील वाद संपुष्टात येण्याऐवजी वाढत आहेत.

उपनगरातील तपोवन रस्त्यावरून शिवसेना-राष्ट्रवादीचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून काम झालेल्या हा रस्ता खराब झाला होता.

आता या रस्त्याचे काम सुरू झाले असून या कामाचे श्रेय घेण्यावरून संघर्ष सुरू झाला आहे. दोन्ही पक्ष हे काम आमच्या मुळेच सुरू झाल्याचे सांगत आहेत. जनतेच्या पैशाचा गैरवापर शिवसेना कदापी सहन करणार नाही.

जोपर्यंत तपोवन रस्ता चांगल्या दर्जाचा होत नाही, तोपर्यंत शिवसेना या कामाकडे लक्ष देणार आहे. शिवसेनेने आक्रमक भूमिका घेऊन पाठपुरावा केला.

त्यामुळे आज पुन्हा या रस्त्याचे काम करावे लागत असल्याचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी म्हटले आहे. रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे, जनतेच्या पैशांचा अपव्यय होऊ नये,

यासाठी आक्रमक भूमिका घेतली तर ‘त्यांच्या’ पोटात गोळा का आला? असा सवाल करत त्यांनी ‘राष्ट्रवादी’ला टोला लगावला आहे. तपोवन रस्त्याच्या कामास नव्याने सुरुवात झाली आहे जोपर्यंत हा रस्ता दर्जेदार आणि मजबूत होत नाही.

तोपर्यंत आम्ही जनतेसाठी आंदोलन करत राहणार. ज्या राजकीय लोकांनी रस्त्यासाठी काहीही केले नाही. कुठला निधीही आणला नाही ते आज या रस्त्यावर निर्लज्जपणे फिरत आहे ही शरमेची बाब आहे,

असे टिकास्त्र महापालिकेचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी शिवसेनेचे नाव न घेता सोडले आहे. तपोवन रस्त्याच्या कामाची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी पाहणी केली यावेळी बारस्कर बोलत होते.

याप्रसंगी बाळासाहेब पवार, डॉ. सागर बोरुडे, नितीन बारस्कर, निखिल वारे, योगेश ठुबे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. तपोवन रस्त्याच्या कामाला पुन्हा सुरूवात झाल्यानंतर शिवसेना नगरसेवक, पदाधिकार्यांनी कामाची पाहणी केली.

यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, विक्रम राठोड, संभाजी कदम, संजय शेंडगे, गिरीश जाधव, बाळासाहेब बोराटे, अमोल येवले, सचिन शिंदे, अक्षय कोतोरे, डॉ. चंद्रकांत बारस्कर, ऋषीकेश ढवण,

अभिषेक भोसले, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. बारस्कर म्हणाले, तपोवन रस्त्यासाठी अनेक वर्षापासून आ. संग्राम जगताप व आम्ही राष्ट्रवादी व काँग्रेसचे सर्व नगरसेवक हा रस्ता उत्कृष्ट दर्जाचा होण्यासाठी पाठपुरावा करुन

शासनाकडून निधी मिळविण्याचा प्रयत्न करत होतो. त्यासाठी अनेक आंदोलने केली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याचे काम पूर्ण झाले. त्यानंतर काही ठिकाणी हा रस्ता खराब झाल्याने आम्ही आंदोलन केले होते.

त्यावेळी संंबंधित अधिकार्याने पावसाळ्यानंतर रस्त्याचे काम पुन्हा नव्याने सुरू करण्यात येईल असे पत्र दिले होते. आज हे काम नव्याने सुरू झाले असून हा रस्ता जोपर्यंत दर्जेदार होत नाही

तोपर्यंत आम्ही या रस्त्यासाठी आंदोलन करत राहणार आम्ही केलेल्या पाठपुराव्याचे इतर कोणीही श्रेय घेऊ नये, असे बारस्कर म्हणाले. कळमकर म्हणाले की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तपोवन रस्त्याचे काम झाले होते.

निकृष्ट कामामुळे रस्त्याची काही दिवसांतच चाळण झाली. शिवसेना उपनेते स्व. अनिल राठोड यांनी याची पाहणी करुन चौकशीची मागणी केली. अधिकार्यांनी तपासणी करुन काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा अहवाल शासनाला दिला.

हा रस्ता पुन्हा चांगला करुन देण्याची मागणी शिवसेनेने केली होती. त्यानुसार या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment