नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम मिळावी’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- महाआघाडी सरकारने सत्तेवर आल्यावर क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजना राबवून थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. त्यांचा सातबारा कोरा केला.

योजना जाहीर करतानाच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना अद्याप प्रोत्साहनपर रक्कम मिळालेली नाही.

ही रक्कम त्वरित मिळावी, अशी मागणी अळकुटी येथील शेतकरी रामदास नरड यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून केली आहे.

पत्रात म्हटले आहे, कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर शेतीमालाचे पडलेले बाजारभाव, अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. प्रोत्साहनपर रक्कम मिळाली, तर त्यांना आधार मिळेल.

शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्यास मदत होईल. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली.त्यांना पुन्हा कर्जही मिळाले.

राज्यात नियमीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या थकबाकीदार शेतकऱ्यांपेक्षा जास्त आहे.या शेतकऱ्यांना सध्याच्या हालाखीच्या परिस्थीतीत प्रोत्साहनपर रक्कम त्वरीत मिळणे आवश्यक आसल्याचे नरड यांनी पत्रात म्हटले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment