जास्तीचे बील आकारुन बील न भरल्याने रुग्णास दोन दिवस ठेवले बसवून

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- जास्तीचे बील आकारुन बील न भरल्याने कोरोना रुग्णास दोन दिवस हॉस्पिटलमध्ये बसवून ठेवणार्‍या नेवासा तालुक्यातील भेंडा येथील खाजगी हॉस्पिटलची मान्यता व सनद रद्द करुन संबंधीत डॉक्टरांवर साथरोग नियंत्रण कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया जवळील भूजल सर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात उपोषण करण्यात आले.

या उपोषणात संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे, श्रीहरी लांडे, बबन वाघुले, रविंद्र सातपुते, अभिजीत डोंगरे, दिपक चोहणे, स्वप्निल पाटोळे, महादेव कांबळे, संपत पवार, सुनिल वाडेकर, अक्षय काळे, सुनिल पवार, अरुण आढाव, बाळासाहेब मानकर आदी सहभागी झाले होते. नेवासा तालुक्यातील भेंडा येथील खाजगी हॉस्पिटलच्या कोविड सेंटरकडून रेणुकनाथ भवार या रुग्णास जास्तीचे बिल आकारून बिल अदा न केल्याने डिस्चार्ज होऊन

देखील दोन दिवस बसवून ठेवण्यात आले. केवळ पैसे न भरल्याने सदर रुग्णाची पिळवणुक करण्यात आली. याबाबत रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रार केल्याने संबंधित हॉस्पिटलच्या कर्मचारी व डॉक्टरांनी त्यांच्याशी अरेरावी करून दमबाजी करण्यात आली. वास्तविक पाहता कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांच्या सेवेसाठी खाजगी रुग्णालयांना कोविड सेंटरची परवानगी देण्यात आली. धनदांडग्या हॉस्पिटलने ही मान्यता घेऊन सर्वसामान्यांची लूट केली आहे.

शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारुन सर्व नियम पायदळी तुडवले. जीवनदायी योजना लागू असलेल्या हॉस्पिटलला कोविड सेंटरची परवानगी देण्याऐवजी डोळेझाकपणे खाजगी हॉस्पिटलला परवानगी देण्यात आली. याची देखील उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेची असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. तर भरारी पथक देखील संशयाच्या भोवर्‍यात असून, त्यांनी समाधान पध्दतीने कार्य केले नाही. यामध्ये देखील गैरप्रकार झाला असल्याचा

आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. भेंडा येथील कोविड सेंटरच्या गैरकारभाराबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. त्यांनी कारवाईचे आश्‍वासन दिले होते. याची कार्यवाही न झाल्याने छावा क्रांतीवीर सेना व पिडीत कुटुंबीयांच्या वतीने उपोषण सुरु करण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment