निकृष्ठ रस्ता दुरुस्तीचे काम बंद पाडले; रस्त्यावरच केले असे काही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात सर्वत्र रस्त्यांची अक्षरश चाळण झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून यामुळे अपघाताचे सत्र देखील सुरूच होते.

तसेच शहरातून जाणाऱ्या रस्त्यांची झालेली दुरवस्था देखील नेहमीच चर्चेत असते. या रस्ता दुरुस्तीसाठी अनेकवेळा आंदोलने झाली आहे. प्रशासन मात्र याबाबत गंभीर नाही असे दिसून येत आहे.

याच अनुषंगाने आज नगर-जामखेड रोड येथे राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत जामखेड नाका ते आठवड या १९ किलोमीटर रस्त्याचे पॅचींगचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप करीत काम बंद पाडून जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन करण्यात आले. खड्डे बुजवण्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असून,

खड्डे फक्त खडी टाकून बुजवले जात आहे. त्या खड्ड्यांमध्ये डांबर सुद्धा वापरले जात नसल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. खड्डे बुजविण्याचे काम योग्य पध्दतीने न झाल्यास पुन्हा हा रस्ता खराब होण्याची शक्यात निर्माण झाली आहे.

रस्त्यासाठी सुमारे १५ कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे. एवढा खर्च करुन देखील रस्ता चांगला न झाल्यास नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. यामुळे हे काम बंद पाडत उत्कृष्ठ प्रतीचे काम करण्यात यावे अन्यथा काम होऊ देणार नसल्याचे संघटनेच्या वतीने इशारा देण्यात आला आहे.

हे आंदोलन जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे. यावेळी गणेश निमसे, अमित गांधी, वजीर सय्यद, शरद बेरड, गौरव बोरकर, मच्छिंद्र गांगर्डे, हनुमंत कल्हापुरे आदी सहभागी झाले होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment