मराठी माणसांनी नोकरी मागे न पळता व्यवसायात उतरावे -कॅप्टन अरूण कदम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- मराठी माणसांनी नोकरी मागे न पळता व्यवसायात उतरावे. सध्या बेरोजगारीमुळे नोकर्‍या मिळणे कठिण झाले आहे. नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे बनण्याची गरज आहे.

मराठी माणसांमध्ये क्षमता असून त्यांनी धाडसाने व्यवसाय व औद्योगिक क्षेत्रात पाऊल टाकण्याचे आवाहन भारतीय देशभक्त पार्टीचे कोषाध्यक्ष कॅप्टन अरूण कदम यांनी केले.

केडगाव उपनगरातील नागरिकांच्या सोयीसाठी शाहूनगर रोड येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या श्री सुपर मार्केटच्या उद्घाटनप्रसंगी कॅप्टन कदम बोलत होते.

यावेळी भारतीय देशभक्त पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी डमाळे, मार्केटचे संचालक सिध्दार्थ डमाळे, निवृत्त एसीपी सिताराम गायकवाड, भगवान कराळे, उद्योजक रावसाहेब कराळे,

आदित्य कुलकर्णी, महेश जाधव, हिमांशू शेरकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात सिध्दार्थ डमाळे यांनी श्री सुपर मार्केटच्या माध्यमातून नागरिकांना एका छताखाली किराणा, अन्न-धान्य, डेअरी प्रोडक्टस,

कॉस्मेटिक्स व सर्व घरगुती साहित्य मिळणार आहे. केडगाव उपनगरातील नागरिकांना एका छताखाली सर्व गरजेचे साहित्य मिळावे या भावनेने हे मार्केट सुरु करण्यात आले असून,

नागरिकांनी फ्री होम डिलवरी सर्व्हिस देखील मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. अ‍ॅड. शिवाजी डमाळे म्हणाले की, प्रस्थापित घराणेशाहीचे प्रस्थ असलेले मंडळी सर्वसामान्य व मध्यम वर्गातील तरुणांना नोकरी देऊन त्यांचा वापर करुन घेतात.

सुशिक्षीत तरुणांनी घराणेशाही नेत्यांकडे नोकरी मागायला न जाता स्वत:च्या हिंमतीवर व्यवसाय उभा करावा. इतरांकडे राबण्यापेक्षा स्वत:चे व्यवसाय थाटल्यास बेरोजगारीचा प्रश्‍न देखील मार्गी लागण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment