विजेच्या शॉर्टसर्किटमुळे 25 लाखांचा ऊस जळून खाक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात यंदाच्या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

कोरोनामुळे आधीच हतबल झालेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने आर्थिक संकटात पाडले आहे. यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.

यातच राहाता तालुक्यातील राजुरी येथे शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट होऊन पंधरा ते सोळा एकर उसाच्या पिकामध्ये आग लागली.

सह ठिबक सिंचनाचे संच या आगीत जळून खाक झाले असून यामध्ये अंदाजे 20 ते 25 लाखांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. उसाच्या पिकासह ठिबक सिंचन नळ्या, ड्रीप, पाईपसह जळून खाक झाले आहे.

जोराचे वारे असल्यामुळे उसाने वेगाने पेट घेतल्यामुळे ही लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अग्निशामक दल व त्यांचे कर्मचारी तसेच श्रीरामपूर नगरपरिषदेची अग्निशामक दल यांनी अथक प्रयत्न करूनही मोठे नुकसान झाले.

दरम्यान या आगीमुळे शेतकऱ्यांचे अंदाजे वीस ते पंचवीस लाखांचे नुकसान झाले आहे. आधीच कोरोनाची महामारी त्यातच परतीच्या पावसामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यास मोठा आर्थिक फटका बसला आहे.

या जळालेल्या उसाचा महावितरणचे कर्मचारी, तलाठी यांनी पंचनामा करून तातडीने मदत करावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment