अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ हजार ३८१ कोटी रुपयांची कर्जमाफी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेंतर्गत नगर जिल्ह्यातील जिल्हा बँकेचे थकबाकीदार असलेल्या १ लाख ९८ हजार ३४० शेतकऱ्यांना शनिवार ९ नोव्हेंबर अखेरपर्यंत १ हजार ३८१ कोटी २९ लाखांची कर्जमाफी झाली आहे.

राज्यात सर्वाधिक मोठी कर्जमाफी ही नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेचा महाविकास आघाडी सरकारने जानेवारीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार नगर जिल्ह्यातील २ लाख ५८ हजार ७५५ शेतकरी महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरवले होते.

जिल्ह्यात नगर जिल्हा बँकेचे सर्वाधिक थकबाकीदार शेतकरी होते. कर्जमाफीच्या घोषणेनंतर थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी बँकेने २८७ शाखा व ११ विस्तार कक्षामार्फत शेतकऱ्यांच्या आधारकार्डचे प्रमाणीकरण केले.

आधार कार्ड ऑनलाइन लिंकिंग केले त्यामुळे जिल्हा बँकेमार्फत राज्य सरकारच्या सहकार विभागाला पाठवलेल्या बहुतांशी शेतकऱ्यांची नावे पात्र ठरवली होती. शनिवारपर्यंत जिल्हा बँकेचे थकबाकीदार सभासद असलेल्या १ लाख ९८ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १ हजार ३८१ कोटी २९ लाख रुपयांची कर्जमाफी वर्ग केली आहे.

दरम्यान, जिल्हा बँकेने खरिपासाठी ३ लाख ६ हजार ५५१ शेतकऱ्यांना १ हजार ८४१ कोटींचे कर्ज वाटप केले. उद्दिष्टापेक्षा ३४३ कोटी अधिक कर्ज वाटप जिल्हा बँकेने यंदा केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment