त्या विकासकामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :-श्रीगोंदे तालुक्यातील कोळगाव येथे विविध निधींमधून झालेल्या विकासकामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य संपत शिरसाठ यांनी केली आहे.

तसेच या मागणीसाठी शिरसाठ यांनी ग्रामपंचायत कार्यालय कोळगाव येथे १२ ऑक्टोबर रोजी उपोषण केले होते. ग्रामपंचायत सदस्य संपत शिरसाठ यांनी कोळगाव येथे विविध निधींमधून दलीत वस्तीमधील गणपती मंदिरासमोर ५ लाख रुपयांचे पेव्हिंग ब्लॉक, ४ लाख रुपये खर्चून नादुरुस्त असलेली

दलीत वस्तीमधील गटार योजना, ८ लाख रुपये खर्चून तोंडेवाडी, तसेच मोहोरवाडीकडे जाणाऱ्या सव्वा किलोमीटर रस्त्यावर केलेले मुरुमीकरण आदी कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

कोळगाव येथे झालेले विविध विकासकामे ही वेगवेगळ्या ठेकेदारांच्या नावाने घेऊन गावातील पुढाऱ्यांनी केली आहेत. मात्र, गावपुढाऱ्यांनी या विकासकामांचा दर्जा सुमार ठेवून, तसेच अपूर्ण ठेवून संबंधित कामाची बिले काढून घेतले असल्याची माहिती ग्रा. पं. सदस्य संपत शिरसाठ यांनी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment