बिहार निवडणुकीवरून आमदार रोहित पवारांनी भाजपाला टोला लगावला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- सध्या देशाचं लक्ष लागलेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीसाठी अखेरच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. यानंतर विधानसभा निवडणुकीत कोण जिंकणार आणि कुणाचं सरकार स्थापन तयार होणार याविषयी कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

दरम्यान बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा अधिकृत निकाल 10 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. पण त्यापूर्वी जाहीर झालेल्या विविध संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये बिहारमध्ये भाजप प्रणित एनडीएला मोठा फटका बसणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

यापार्श्वभूमीवर कर्जत – जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपाला चांगलाच टोला लगावला आहे. आमदार पवार यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हणाले कि, बिहारमध्ये विरोधकांसाठी टाकलेल्या जाळ्यात भाजपप्रणित एनडीए स्वतःच गुरफटल्याचं एक्सिट पोलवरून दिसतंय.

याचाच अर्थ सकारात्मक राजकारण सोडून दुसर्‍याला पाडण्यासाठी खड्डा खोदला तर त्यात आधी स्वतःचाच पाय अडकतो, याचा अनुभव भाजप घेतोय.

त्यामुळं आता यातून तरी भाजपने काहीतरी बोध घ्यावा. असा सणसणीत टोला पवार यांनी भाजपला लगावला आहे. दरम्यान बिहार मध्ये कोरोनाच्या काळात झालेल्या निवडणुकीच्या निकालाकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment