संकटात सापडलेल्या दूध उत्पादक शेतकर्‍यांची दिवाळी गोड

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाच्या संकटकाळाची जाणीव ठेऊन बिरोबा दूध संकलन केंद्रास (ता. राहुरी) दूध पुरवठा करणार्‍या दूध उत्पादक शेतकर्‍यांची दिवाळी गोड करुन त्यांचा सन्मान करण्यात आला.

दूध उत्पादक शेतकर्‍यांना एकरकमी ठेव, बोनस म्हणून साखर वाटप तसेच स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व शाल, फेटा देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. घोरपडवाडीचे माजी उपसरपंच नवनाथराव शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी उपसरपंच आप्पासाहेब बाचकर, भानूदास झावरे, गोरख थोरात, बाबासाहेब श्रीराम, पोपट थोरात, बाबासाहेब हापसे,

बाळासाहेब बाचकर, गोपीनाथ शेंडगे, बाबुराव शेंडगे, कृष्णा सरोदे आदींसह दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविकात विकास गडधे व बापुसाहेब शेंडगे यांनी बिरोबा दूध संकलन शेतकर्‍यांच्या कार्याची जाणीव ठेऊन आपले मार्गक्रमण करीत आहे. वेळेवर पगार, उच्चतम दर, पारदर्शक कारभार हे संकलन केंद्राचे वैशिष्ट्ये त्यांनी स्पष्ट केले.

बिरोबा दुध संकलन केंद्राचे चेअरमन गणेश तमनर यांनी शेतकर्‍यांपुढे कोरोना महामारी व अतिवृष्टीचे संकट आले असताना त्यांना आधार देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. शेतकर्‍यांपुढे सध्या दूध उत्पादन हे एकमेव उत्पन्नाचे स्त्रोत असताना त्यांची दिवाळी गोड करण्यात आली. यासाठी ज्येष्ठ बंधू नारायणराव तमनर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगितले.

1 सप्टेंबर 2019 ते 31 ऑगस्ट 2020 या कालावधीत दूध पुरवठा करणार्‍या दूध उत्पादकांना दोन रुपये लिटर प्रमाणे जवळपास 20 लाख एक रकमी ठेव खात्यात वर्ग करण्यात आली. दिवाळीला बोनस म्हणून जवळपास 40 क्विंटल साखर वाटपचे नियोजन करण्यात आले आहे.

दिवाळीच्या आठ दिवस अगोदर ठेव जमा झाल्याने दूध उत्पादक शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सध्याच्या कोरोना महामारी व अति पर्जन्यमानामुळे शेतीच्या पिकाचे मोठे नूकसान झालेले आहे. दुध धंद्याचा एकमेव आधार शेतकर्‍यांमध्ये आहे.

एकूण 141 दूध उत्पादकांमधून 1 ते 10 नंबर काढून जनाबापू देवकाते, अरुण शेंडगे, पोपटराव तमनर, बाळासाहेब हापसे, मारुती लोंढे, बाळासाहेब तमनर, सोपान येळे, गोरख बाचकर, विजय बाचकर, नानाभाऊ बाचकर यांचा प्रातिनिधिक स्वरुपात सन्मान करण्यात आला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment