अरे वा ! स्मार्टफोनशी कनेक्ट होणारी रॉयल एनफील्डची ‘ही’ बहुप्रतीक्षित बाईक लॉन्च

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- रॉयल एनफील्डने आपले सर्वाधिक प्रतिक्षीत असलेली बुलेट मीटियर 350 भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. त्याची प्रारंभिक किंमत 1.76 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

ग्राहक फायरबॉल, सेटेलर आणि सुपरनोव्हा या तीन भिन्न वैरिएंट मध्ये ते विकत घेऊ शकतील. यात त्यांना पिवळा, काळा आणि लाल रंगाचा पर्याय मिळेल. लॉन्चबरोबरच कंपनीने त्याचे बुकिंगही सुरू केले आहे.

प्रथमच स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी

  • – या बुलेटमध्ये 349cc एयर-कूल्ड सिंगल सिलिंडर BS6 कंप्लायंट इंजिन आहे. हे 20.5hp पॉवर आणि 27Nm टॉर्क जनरेट करू शकते. इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. बुलेटमध्ये कंपनीने स्मार्ट कनेक्टिव्हिटी दिली आहे.
  • – रायडर्स रॉयल एनफिल्ड अ‍ॅपच्या मदतीने बाईकशी त्यांचा फोन कनेक्ट आणि नियंत्रित करू शकतील. आपण फोनवरून नेव्हिगेशन कनेक्ट करून इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये पाहू शकता. प्रथमच, असे फीचर कंपनी बुलेटमध्ये ऑफर करीत आहे.
  • – मीटियर 350 ला डिजिटल अ‍ॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळेल, ज्यामध्ये रायडर्स गीअर पोजीशन, ओडोमीटर, फ्यूल गेज, ट्रिप मीटर आणि सर्व्हिस रिमाइंडर यासारखी फीचर्स पाहण्यास सक्षम असतील.
  • – सुरक्षिततेसाठी, यात ड्युअल चॅनेल एबीएस, ट्विन शॉक एब्जॉर्ब, एलईडी डीआरएलसह सर्कुलर हलोजन हेडलॅम्प, एलईडी टेल लॅम्प आणि 41 मिमी टेलिस्कोपिक फॉर्क्स आहेत. बुलेट सीट देखील दोन लोकांसाठी सोयीस्कर आहे. यात बॅकरेस्टही दिला आहे.
  • – भारतीय वाहन बाजारात ती होंडा H’Ness CB350 आणि जावा ट्विनशी स्पर्धा करेल. होंडा H’Ness CB350 ची एक्स शोरूम किंमत सुमारे 1.85 लाख रुपये आहे आणि जावा ट्विनची एक्स-शोरूम किंमत 1.64 लाख रुपये आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment