मुख्य आरोपीला अटक करा, शिवाजी कर्डिले यांची मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यातील बनावट डिझेल व नाफ्ता भेसळ रॅकेटचा पोलिस पथकाने कारवाई करून वीस दिवसांचा कालावधी उलटला आहे.

मात्र, अद्याप डिझेल रॅकेटमधील मुख्य सूत्रधाराला अटक झालेली नाही. यापूर्वीच्या नाफ्ता भेसळ प्रकरणाचा तपासही अजून पूर्ण झालेला नाही. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे समजते.

यातील मुख्य सूत्रधारला त्वरित अटक करावी, अशी मागणी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली. अमोल भनगडे, सुभाष गायकवाड, राजेद्र उंडे,

रवींद्र म्हसे, जब्बार पठाण, नयन शिंगे, अंकुश बरडे, सचिन म्हेत्रे, सुजय काळे, विनित ठसाळ, दीपक वागळे, नारायण धोगडे, नारायण धनवट, अजित दावकर उपस्थित होते.

नगर जिल्ह्यामध्ये डिझेल व नाफ्ता भेसळीचे मोठे रॅकेट कार्यरत आहे. या रॅकेटला राजकीय वरदहस्त असल्याने बनावट डिझेल विक्री केली जात आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास पूर्णत्वास गेलेला नाही.

आता पुन्हा डिझेल भेसळीचे रॅकेट उजेडात आलेले आहे. डिझेल भेसळीबाबत पोलिस पथकाने कारवाई करून वीस दिवस उलटले आहे. मात्र, अद्यापपर्यंत या प्रकरणातील मुख्य सूत्रधार व इतर आरोपींना अटक केलेली नाही.

या प्रकरणाचा योग्य तपास न झाल्यास विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून विधानसभेमध्ये आवाज उठवला जाईल. १० दिवसांत पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसू, असा इशारा देण्यात आला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment