खड्ड्यात कार आदळून झाडावर धडकली,तरुणाचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-सुपे रस्त्यावर रविवारी पहाटे दोन वाजता झालेल्या अपघातात पारनेरमधील शुभम अनिल इथापे (२२) याचा मृत्यू झाला. शुभम मोटारीने सुप्याला निघाला होता.

खड्ड्यामध्ये मोटार आदळल्याने शुभमचे नियंत्रण सुटून झाडावर मोटार धडकली. मोटारीचा चक्काचूर होऊन शुभम गंभीर जखमी झाला. सहाच्या सुमारास हंगे येथील तरुणांच्या निदर्शनास हा अपघात आला.

त्यांनी १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क करून शुभमला नगरच्या शासकीय रुग्णालयात पाठवले. प्रकृती गंभीर असल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला.

मात्र, तेथेही उपचार होऊ शकले नाहीत. काही वेळानंतर शुभमचा मृत्यूू झाला. दुपारी तीन वाजता पारनेर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment