दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महानगरपालिका तयार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची झुंबड उडाली आहे. फिजिकल डिस्टन्सिंगला फाटा देत उसळलेली ही गर्दी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला निमंत्रण देणारी ठरण्याची भीती आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. दिवाळीमुळे नगरची बाजारपेठ फुलून गेली आहे. कोरोनाबाधितांची संख्या घटत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांवर पोहोचले आहे.

त्यामुळे नागरिकही बिनदिक्कत फिजिकल डिस्टन्सिंगला फाटा देत आहेत. महापालिकेच्या रामकरण सारडा वसतिगृहातील कोरोना तपासणी केंद्रातील गर्दी ओसरली आहे.

लाॅकडाऊन कालावधीत या केंद्रात दररोज ३०० ते ४०० रुग्णांची कोरोना तपासणी केली जात होती. सद्यस्थितीत या केंद्रात दररोज अवघे ४० ते ५० जण तपासणीसाठी येत आहेत.

तीन कोरोना उपचार केंद्रही रुग्ण कमी झाल्याने मनपाने सॅनिटाईझ करून तूर्त बंद ठेवलेे आहेत. रुग्णसंख्या वाढल्यास ते पुन्हा सुरू केले जातील. बाजारपेठेत गर्दी वाढल्याने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता अाहे.

प्रशासनाकडून नागरिकांना गर्दी टाळण्याचे, तसेच मास्क व सॅनिटायझर वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महापालिकेच्या शहरातील सात आरोग्य केंद्रांत रुग्णांचे सॅम्पल घेण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment