राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर दौऱ्यावर असलेले राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भारतीय जनता पक्षात जाण्याची भाषा केली. राज्यमंत्री कडू यांच्या या प्रतिक्रियांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

कायदा कुठलाही ठेवा मात्र त्यात दोन बदल करा, शेतकऱ्याच्या शेतमालाला ५० टक्के नफा धरून हमीभाव काढले पाहिजे, आणि ते खरेदी करण्याची याबाबत सरकारने हमी घेतली पाहिजे,

तेवढा कायदा केला तर मी भाजपात जाईल आणि त्यांची सेवा करण असे जलसंधारण राज्य मंत्री बच्चू कडू म्हणाले, ते अहमदनगर मध्ये बोलत होते,

अहमदनगर येथील जलसंपदा कार्यालयामध्ये अपंगांसाठी सुरू करण्यात आलेल्या संपर्क कार्यालयाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अंध अपंग बांधवासाठी हा अत्यंत निराधार आणि दुर्लक्षित परिवारासाठी हे कार्यालये आहेत,

तसेच यावेळी बिहार निवडणुकांवर बोलताना ते म्हणाले राजकारणात कमी जास्त चालू असते, हवा कमी जास्त होत असते मात्र पाहिजे तेवढा मोठा विजय भाजपला भेटला नाही.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment