वाचन चळवळ तरुणाईत वृद्धींगत व्हावी – विक्रम राठोड

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- मानवी संवेदना जागृत राहण्यासाठी वैचारिक जडण-घडण होण्यासाठी वाचन व ग्रंथाचे महत्व अमुल्य आहे. दिवाळी अंकाची वैचारिक संस्काराची परंपरा गेली अनेक दशके वाचकांच्या मनात राज्य करुन आहेत.

वैचारिक संस्काराची, वाचन चळवळ ही तरुण पिढीत वृद्धींगत होण्यासाठी दिवाळी अंक हे मोठे माध्यम असल्याचे उद्गार जिल्हा वाचनालयाचे कार्यवाह विक्रम राठोड यांनी काढले. अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे कार्यवाह विक्रम राठोड यांनी काढले.

अहमदनगर जिल्हा वाचनालयात वाचकांना दिपावलीनिमित्त दिवाळी अंकाचे स्वागत व वाचकांना वितरण कार्यक्रमप्रसंगी श्री.राठोड बोलत होते. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक, उपाध्यक्ष अजित रेखी, संचालक दिलीप पांढरे, प्रा.ज्योती कुलकर्णी, किरण अगरवाल, अनिल लोखंडे, गणेश अष्टेकर, कवी चंद्रकांत पालवे,

उद्योजक महेश देशमुख, ग्लोबलचे नरसाळे, नंदकुमार आढाव, ग्रंथपाल अमोल इथापे, नितीन भारताल आदि उपस्थित होते. प्रा.मोडक यांनी प्रास्तविकात जिल्हा वाचनालयाने याही वर्षी रसिक वाचकांना सुमारे 500 दिवाळी अंकाची मेजवाणी उपलब्ध केली. तरुणाई, महिला, बालके,

कुमार यांच्यासाठी तसेच कथा, पाककला, विनोदी, बालकांसाठी, भविष्य, आरोग्य यासारख्या विविध विषयावर दिवाळी अंक सर्वांच्याच आवडी जपणारे असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिवाळी अंकाचे वाचकांना वितरण करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित मान्यवर अभिजित भळगट, सुरवि लॅबचे रवि पाटोळे,

सुरेश मैड, आकाश इराबत्तीन, शुभम नागरे यांचा वाचनालयाच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी रसिक वाचक, अविनाश रसाळ, मोहन पाठक, मुळे, कुलकर्णी आदि उपस्थित होते. या दिवाळी अंकांचा लाभ वाचकांनी घ्यावा, असे आवाहन ग्रंथपाल अमोल इथापे यांनी केले आहे. आभार प्रा.ज्योती कुलकर्णी यांनी मानले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment