ऐन दिवाळीत नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांवर आली संक्रांत; या भाजप आमदाराच्या घरासमोर उद्या आंदोलन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- शेवगाव नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्नाबाबत तोडगा न निघाल्याने ऐन दिवाळीत कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. यामुळे सर्व कर्मचारी उद्या बुधवार (दि.११ नोव्हेंबर) रोजी शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांच्या निवास्थानासमोर आंदोलन करणार आहे.

काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या? ४ महिन्यांचे थकीत वेतन, कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ता, दिवाळी सणासाठी १० हजार रुपये ऍडव्हान्स, जानेवारी व फेब्रुवारी या २ महिन्यांचे महागाई भत्ता देण्यात यावा, नगरपरिषद कर्मचाऱ्यांची सेवा जेष्ठता यादी जाहीर करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

शेवगाव नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी सोमवार दि. ९ नोव्हेंबर पासून नगरपरिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले असून याच मागण्यांसाठी बुधवार दि. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा. शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या भाजप च्या आ. मोनिकाताई राजळे यांच्या शेवगाव येथील निवासस्थानासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात

येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्रा. किसन चव्हाण यांनी दिली. दरम्यान शेवगाव नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास गरकळ व कर्मचारी यांच्यात चर्चा झाली.

परंतु ही चर्चा निष्फळ ठरल्यामुळे जो पर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाहीत तो पर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका कामगार संघटनेने घेतल्यामुळे हे आंदोलन दुसऱ्या दिवशी सुरूच होते.

या आंदोलनास भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते संजय नांगरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रंधवणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्ता फुंदे प्रशांत भराट, बाळासाहेब फटांगरे, सर्पमित्र भाऊ बैरागी आदींनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment