नर्सरीचे ऑफिस तोडून चोरटयांनी रोख रक्कम सह बियाणे केले लंपास

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात लुटमारी, चोरी, दरोडा, घातपात अशा गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकीकडे दिवाळीचा सण आला आहे तर दुसरीकडे संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. दरम्यान संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे नाशिक पुणे महामार्गालगत अष्टविनायक हायटेक नर्सरीचे ऑफिस तोडून रोख रक्कम व विविध जातीचे बी बियाणे चोरून नेल्याची घटना घडली आहे.

यामध्ये १ लाख ११ हजार रुपयांचा माल लांबविला आहे. मंगळवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारस ही घटना घडली आहे. या घटनेतील चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संदीप तान्हाजी लेंडे हे आळेफाटा येथील रहिवाशी आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, घारगाव शिवारात अष्टविनायक हायटेक नर्सरी आहे.

त्यांनी विक्रीसाठी झेंडू, टोमाटो, कोबी, वांगी आदी बी बियाणे विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी नर्सरीत प्रवेश करीत ऑफिसचे शटर उचकटून आत प्रवेश केला.

कपाटातील बी बियाणे व रोख रक्कम असा १ लाख ११ हजार रुपये लंपास करीत पोबारा केला. लेंडे हे सकाळी नर्सरीत गेले असता चोरी झाल्याचे त्यांना समजले.

सीसीटीव्ही कॅमेरा तपासला असता शटर उचकटून दोन जणांनी आत प्रवेश केला तर काही जण बाहेर थांबलेले होते. याबबत संदीप लेंडे यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment