ऐन दिवाळीत या तालुक्यात विजेचा लपंडाव सुरु

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- दिवसा कामाच्या वेळी वीज नसणे तसेच रात्री अपरात्री ती गुल होणे या प्रकारामुळे अनेकांना सध्या झोपमोडीचा त्रास होत आहे.

दिवाळीच्याकाळात खरेदीसाठी बाजार गर्दी असते मात्र विजे आभावी व्यावसायिकांना खरेदी विक्रीचे व्यवहार सुरळीत ठेवण्यात अनेक अडचणी येत आहेत. असा काहीसा प्रकार सध्या पाथर्डी तालुक्यात सुरु आहे. सणासुदीच्या काळात पाथर्डी शहरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवावा.

तो खंडित झाला नाही पाहिजे, अन्यथा तीत्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांनी निवेदनाव्दारे दिला आहे. या बाबत पाथर्डी महावितरण कंपनीचे शहर अभियंता मयूर जाधव यांना निवेदन देण्यात आले. महावितरणला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिवाळी रोषणाईचा सण आहे.

पण आपल्यामुळे हा सण अंधारात साजरा करण्याची वेळ शहरवासियांवर आली आहे. दिवाळी सणामध्ये नागरिक खरेदीसाठी बाहेर पडतात. त्यामुळे शहरातील सर्व छोट्या मोठ्या व्यापारी वर्ग, तसेच नागरिकांना या विजेच्या समस्येला सामोरे जावे लागत आहेत.

महिला भगिनी या वर्षाच्या सणासाठी वेगवेगळे खाद्य पदार्थ बनवत असतात. वारंवार वीज पुरवठा खंडित होण्यामुळे त्यांना प्रचंड त्रास होतो. फक्त दिवाळीच नाही तर कायमस्वरूपी वीजपुरवठा सुरळीत करावा. तसेच याचे लेखी आश्वासन द्यावे, अन्यथा येत्या दोन दिवसांत तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment