मास्कसंबंधी कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-राज्य सरकार जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून शिर्डी परिसरात शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी पोकॉ किशोर औताडे व त्यांचे सह कर्मचारी हे शिर्डीत पिंपळवाडी चौक, नगर-मनमाड रस्त्यावर विनामास्क असलेल्या व्यक्तीवर सकाळी ११ च्या सुमारास कारवाई करत असताना त्यांना दोन तरुण व एक महिला विनामास्क आढळून आले.

त्यांनी संबंधीत तिघांना थांबवून विषाणू साथ रोग अनुषंगाने तुम्ही विनामास्क फिरत असल्याने तुमच्यावर केस करण्यासाठी कायदेशीर कारवाई करत असताना आरोपींनी पोलीस कॉ. किशोर औताडे व त्याच्या साथीदारास धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणला.

याप्रकरणी पोकॉ आताडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी मुरुगण सेल्वहराज देवेंद्र, वय ३३, रा. विर्लेपाले, वेस्ट मुंबई, व्यंकटेश सुब्रम्हण्यम तेवर, वय २७, रा. लिंक रोड मुंबई,

मशिला मणि मारुमुत्तू पर्याजू, वय ३४ रा. विलेपार्ले वेस्ट मुंबई या तिघांविरुद्ध शिर्डी पोलिसात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आता. यातील दोघा आरोपींना शिर्डी पोलिसांनी अटक केली असुन सपोनि घुगे हे पुढील तपास करीत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment